Shreerang Vidyalaya

शाळा

शाळा म्हणजे एक वेगळेच तत्व

जेथे खुलते आपले व्यक्तीमत्त्व

शाळा म्हणजे ज्ञानाचा वर्ग

जेथून मिळतो यशाचा मार्ग

शाळा म्हणजे प्रगतीचे पाऊल

जेथून मिळते नव्या दिशांची चाहूल

शाळा म्हणजे एक नाविन्यपूर्ण कला

जशी विदयाधाम प्रशाला

आशिया खंडातील सर्वात जुनी अशी १२३ इमारतींची श्रीरंग सहनिवास सोसायटी मध्ये सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या सोसायटीमध्ये श्रीरंग एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीरंग विदयालय प्राथमिक विभाग आहे. शाळेची स्थापना १९७२ साली झाली.

इवल्याशा लहान रोपटयाचा आज मोठा वटवॄक्ष झालेला आपण पाहत आहोत.याचे सर्व श्रेय श्रीरंग एज्युकेशन सोसायटी च्या आजपर्यंत झालेल्या सर्व मान्यवर पदाधिकारी व श्रीरंग सहनिवासातील सर्व रहिवासी यांना जाते. त्यांच्या अथक प्रयत्नांनी आज आपण शाळेची झालेली भरभराट पाहत आहोत.

शाळेला ४५ वर्षे पूर्ण झालेली असून लवकरच आपण सुवर्णमहोत्सवाच्या दिशेने वाटचाल करत आहोत.

इ. १ ली ते ४ थी च्या प्रत्येकी ३ तुकडया असून १२ वर्ग खोल्या असून विद्यार्थींना खेळण्यासाठी भव्य पटांगण उपलब्ध आहे. इतर सर्व भौतिक सुविधांनी युक्त अशी परिपूर्ण असलेल्या शाळेमध्ये भाषा, गणित‚ परिसर अभ्यास‚ चित्रकला‚ कार्यानुभव‚ शा.शिक्षण‚ संगीत‚ योगासने‚ यांचे परिपूर्ण ज्ञान विद्यार्थींना दिले जाते.

शैक्षणिक वर्ष २०१३ १४ पासून इ. १ ली ते ४ थी च्या सर्व वर्गांना सेमी इंग्रजी मधून शिक्षण देण्यास सुरवात केली आहे. शाळेत विषयानुरूप अध्ययन अध्यापन नाविन्यपूर्ण शै. साहित्याचा वापर वैयक्तिक मार्गदर्शन विद्यार्थाच्या कलागुणांना वाव नाविन्यपूर्ण उपक्रम आनंददायी शिक्षणपध्दती याप्रमाणे नियोजन करून आजच्या संगणक युगात विदयार्थी टिकून रहावा म्हणून संगणकाचे ज्ञान विद्यार्थींना दिले जाते. तसेच गणित विषयाची आवड निर्माण व्हावी म्हणून ऍबॅकस वर्ग सुरू करण्यात आले आहे. १ ली ते ४ थी चे सर्व विदयार्थी या उपक्रमात सहभागी झालेले आहेत. श्रीरंग एज्युकेशन सोसायटीने अत्यंत अल्प दरात विद्यार्थींना ही संधी उपलब्ध करून दिली आहे.

शाळेमध्ये विविध सहशालेय उपक्रम राबविण्यात येते. नवनीत चित्रकला स्पर्धा कॅमलिन चित्रकला स्पर्धा श्री शंकरमठम संस्कॄत स्पर्धा ब्राम्हण सभा वक्तॄत्व स्पर्धा व माघी गणेशोत्सवानिमित्त गणपती अथर्वशीर्ष सहस्त्र आवर्तनासाठी इ. ४ थी तील सर्व विदयार्थी सहभागी होतात.स्त्री कल्याण वक्तॄत्व स्पर्धा अथर्व ट्रस्ट डोंबिवली कडून चित्रकला हस्ताक्षर भेटकार्ड तयार करणे मेहंदी काढणे या स्पर्धा घेण्यात येतात. तसेच महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा इ. ३ ली ते ४ थी साठी मराठा मंदिर महाराष्ट्र ज्ञानपीठ परीक्षा सामान्य ज्ञान गणित इंग्रजी पुणे अंतरंग आंतरशालेय स्पर्धा कथाकथन हस्ताक्षर स्मरणशक्ती देशभक्तीपर गति गायन वेशभुषा वक्तॄत्व निबंध हस्तकला भाषिक खेळ इ. घेण्यात येतात.

क्रिडा महोत्सव धावणे खो–खो लंगडी चेंडू फेक बादलीत पाणी भरणे नाणेफेक डंबेल्स पळवणे अडथळा शर्यत चमचा लिंबू

सांस्कॄतिक कार्यक्रम आपल्या संस्कॄतीची ओळख व्हावी म्हणून शाळेत विविध धार्मिक व राष्ट्रीय सण मोठया उत्साहाने साजरे केले जातात. आषाढी एकादशी गुरु पौर्णिमा नागपंचमी इ.

शालाबाहय स्पर्धांमध्ये शाळेतील जवळ जवळ ८० टक्के विदयार्थी सहभागी होतात व या परीक्षेत विद्यार्थींना भरभरून यश प्राप्त झालेले आहे. यासाठी मुख्याध्यापक व शिक्षक यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळते. दिप अमावस्या‚ रक्षाबंधन‚ गोपाळकाला‚ गणेशोत्सव‚ नवरात्र‚ दिवाळी‚ मकरसंक्रांत‚ होळी‚ र्इद‚ ख्रिसमस हे सण साजरे केले जातात.तसेच स्वातं य दिन प्रजासत्ताक दिन महाराष्ट्र दिन थोर पुरूष स्त्रिया यांच्या जयंती पुण्यतिथी साज या केल्या जातात. शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते.ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळ आयोजित विविध स्पर्धा विज्ञान दिंडी पर्यावरण महोत्सव क्रांती दौड वर्षा मॅरॅथॉन स्वच्छता अभियान अंतर्गत मानवी साखळी अशा विविध कार्यक्रमांमध्ये विदयार्थी सहभागी होतात.

शिक्षक पालक विदयार्थी यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी वर्षातून २ वेळा पालक सभेचे आयोजन केले जाते. पालकांचे उत्तम सहकार्य शाळेस वेळोवेळी मिळते.

श्रीरंग विदयालय प्राथमिक विभागात एकूण 15 कर्मचारी असून १ मुख्याध्यापक‚ १२ शिक्षक‚ १ लिपीक १‚ शिपार्इ कार्यरत आहेत. सर्व शिक्षक प्रशिक्षित व उच्च शिक्षित आहेत. वेळोवेळी शासनाने आयोजित केलेले सर्व प्रशिक्षण १०० टक्के पूर्ण करणारे असे सर्व गुण संपन्न असे शिक्षक आहेत.

अथर्व ट्रस्ट डोंबिवली तर्फे आदर्श विदयालय पुरस्कार कलाभूषण कलाशिक्षक असे मागील १०० वर्षापासून शाळेला पुरस्कार प्राप्त होत आहेत. तसेच विश्वभूषण बायकस फ़ाऊंडेशन तर्फे आदर्श विदयालय पुरस्कार यावर्षी प्राप्त झाला. अंतरंग पुणे राज्यस्तरीय कला स्पर्धे तर्फे आदर्श विदयालय पुरस्कार‚ आदर्श मुख्याध्यापक प्राप्त झाला.

मज आवडते ही मनापासुनी शाळा………. लाविते लळा ही …………… जशी माऊली बाळा